#करोना काळात बंद झालेल्या शाळा आजपासून मोठ्या शहरात सुरू होत आहेत. मुंबईत आजपासून पहिली ते सातवीच्या शाळा सुरू करण्याचे मुंबई महापालिकेचे निर्देश दिले आहेत. मुबंईत 2034 पहिली ते सातवीच्या शाळा असून 1902 सुरू होणार आहेत.
तीन तासच शाळा असणार असून मधली सुट्टी दिली जाणार नाही.मुंबई पालिकेचे शिक्षणाधिकारी राजू तडवी यांनी याबाबतच्या सूचना दिल्या आहेत.ठाणे महापालिकेचाही आजपासून पहिली ते तवीपर्यंतच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.तर नवी मुंबईतील शाळाही आजपासून सुरू होत. आहेत.करोनाचे सर्व नियम पाळून शाळा सुरू झाल्या आहेत. कॉन्व्हेंट, इंग्रजी माध्यमांच्या शाळांनी ख्रिसमसनंतरचा मुहूर्त साधला आहे.तर पुण्यातल्या शाळा उद्यापासून सुरू होणार आहेत.दरम्यान पालकांमध्ये शाळा सुरू होणार या विषयी संभ्रम निर्माण झाला होता.शाळांकडून कोणत्याही सूचना देण्यात आलेल्या नसल्यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते.